Kolhapur Cemetery :कोल्हापुरात स्मशानभूमीत सलाड पार्टी,अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या चालीरुढींना छेद
अमावस्या आणि पौर्णिमेला स्मशानभूमीत जाणं अपशकुन मानलं जातं. पण याच गैरसमजुतीला छेद देण्यासाठी कोल्हापुरातल्या पोर्ले तर्फ ठाणे इथल्या स्मशानभूमीत सलाड पार्टी करण्यात आली. सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी अमावस्येच्या रात्रीचं औचित्य साधून ही सलाड पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी स्मशानभूमीला आकर्षक सजावटही करण्यात आलेली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ आणि गावातील लोकांना निमंत्रण दिलं होतं. स्मशानभूमीत रक्षाविसर्जनावेळी ठेवलेल्या नैवेद्याला कोणीही हात लावत नाही. पण या सलाडपार्टीत अनेकांनी फळं आणि वरण-भाताचा आस्वाद घेऊन अनेक अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या चालीरुढींना छेद दिला. या आगळ्यावेगळ्या नियोजनाची संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरु झालीय.



















