एक्स्प्लोर
Jejuri Trust Controversy : जेजुरीच्या नव्या विश्वस्तांविरोधात अर्धनग्न आंदोलन
Jejuri Trust Controversy : जेजुरीच्या नव्या विश्वस्तांविरोधात अर्धनग्न आंदोलन
जेजुरी संस्थानच्या विश्वस्त मंडळावर धर्मादाय आयुक्तांनी नुकतीच सात विश्वस्तांची नेमणूक केली. त्यात जेजुरीबाहेरील पाचजणांचा आणि जेजुरीतल्या दोघांचा समावेश आहे. जेजुरीबाहेरील व्यक्ती विश्वस्त म्हणून पूर्णवेळ काम करू शकणार नाहीत, असा स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळं जेजुरीतील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन चक्री उपोषण आणि रास्ता रोको करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पुणे-पंढरपूर रस्ता जेजुरीत अडवून धरण्यात आला. जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर अर्धनग्न आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. मार्तंड देवस्थानच्या भक्तनिवासाबाहेर गावकरी चक्री उपोषण करणार आहे. दररोज दहाजण चक्री उपोषण करणार आहेत.
Tags :
Jejuriमहाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement