Rahul Shewale : भावना गवळी यांच्या व्हिपचं पालन केलं नाही उरलेला गटच धोक्यात येईल : राहुल शेवाळे
abp majha web team
Updated at:
29 Jul 2022 05:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Shewale : शिवसेना आणि शिंदे गटात आता लोकसभेतील गटनेतेपदावरून संघर्ष टोकाला गेलाय. १२ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांना गटनेते राहुल शेवाळे यांनी इशारा दिलाय. भावना गवळी यांच्या व्हिपचं पालन केलं नाही तर उरलेला गटच धोक्यात येऊ शकतो, असा इशारा राहुल शेवाळे यांनी दिलाय. आपली निवड करताना संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्याचंही शेवाळे यांनी म्हटलंय. एकीकडे शेवाळे यांच्या निवडीविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना शेवाळे यांनी शिवसेनेला उलट इशारा दिलाय.