ABP Majha Headlines : 10 AM : 27 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 10 AM : 27 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
गुजरातमधून २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी, देशभरात निर्यातबंदी असताना गुजरातसाठी अपवाद कशासाठी, राज्यातील कांदा उत्पादकांचा संतप्त सवाल.
शरद पवारांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात घेतलं मुखदर्शन, साखरसम्राट अभिजीत पाटीलही उपस्थित
महायुतीच्या रावेरमधील उमेदवार रक्षा खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, निवडणूक अर्जात पुरेशी माहिती न दिल्याचा अपक्ष उमेदवाराचा अर्ज
महायुती लोकसभेच्या उर्वरित सर्व जागांची आज घोषणा करणार, ठाणे आणि नाशिक शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती, तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरात, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार. सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर. डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये दुपारी साडे तीन वाजता सभा.
राहुल गांधी पुण्यात ३ मे रोजी प्रचार करणार, रवींद्र धंगेकरांसाठी SSPMS ग्राऊंडवर सभा घेणार.