Headlines : 07 AM : 10 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणी आज 
सुप्रीम कोर्टात सुनावणी... दोन्ही याचिकांवर एका दिवशी सुनावणीचा निर्णय... उद्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार

सगेसोयऱ्यांच्या प्रस्तावित  कुणबी प्रमाणपत्राविरोधात आज हायकोर्टात सुनावणी..., अधिसूचनेद्वारे  मागवलेल्या हरकतीवर सुनावणी
सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांचं शिंदे आणि अजित पवारांना आश्वासन...जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीत...विमानतळावरच्या बैठकीत शाहांचा महायुतीला विजयाचा कानमंत्र...

अमित शाहांच्या मुुंबई दौऱ्यात चर्चा अजितदादांची...दौऱ्यात अनेक ठिकाणी अजितदादांच्या अनुपस्थितीमुळे लक्ष वेधलं...शेवटच्या क्षणी मुंबई विमानतळावर भेट...
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर साकारण्यात आलेल्या योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब, पुन्हा एकदा श्रेयवादाच्या चर्चेला तोंड
 मनोज जरांगे पाटलांबरोबर जाणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही जाणार नाही, तिसऱ्या आघाडीसोबत बोलताना आंबेडकरांकडून स्पष्टोक्ती, तर राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजेंची जवळीक वाढली
फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही, बीडमधील घोंगडी बैठकीत मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल 
((फडणवीस कायमचे घरी जाणार-जरांगे))
हे खा आणि ते खाऊ नका म्हणजे धर्म नव्हे, सत्य, करुणा, आणि तपस्या म्हणजे धर्म, सरसंघचालक मोहन भागवत यांचं पुण्यात महत्त्वाचं वक्तव्य
((खाण्याच्या अटी म्हणजे धर्म नव्हे-भागवत))


नागपुरातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील ऑडी कार बावनकुळेंचे पुत्र संकेत यांची.. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित होते, अंधारेंचा आरोप. कुणीही असेल तर कारवाई करा, बावनकुळेंचं आवाहन
सीझर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून अक्षम्य हलगर्जीपणा, महिलेच्या पोटात तीन महिन्यांपर्यंत राहिला कापडी नॅपकिन, लातूर जिल्ह्यातील औसा शासकीय रुग्णालयातला धक्कादायक प्रकार 
((सीझरनंतर कापडी नॅपकिन पोटातच! ))
वैद्यकीय विम्यावरील जीएसटी कमी करायचा की नाही याबाबत मंत्रिगटाची स्थापना, GST परिषद नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेणार 
((वैद्यकीय विम्यावर नोव्हेंबरमध्ये निर्णय))
आयफोन 16 सीरिज लॉन्च झाली, आयफोन  16 ची किंमत ६७ हजारांपासून, तर PLUSची किंमती ७५ हजारांपासून सुरुवात.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram