एक्स्प्लोर

Hasan Mushrif PC : चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांची तात्काळ माफी मागावी : हसन मुश्रीफ

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत भुजबळ यांनी धमकी दिली होती. आता याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्यासोबतच गोकुळ महासंघाच्या निवडणूकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचं पॅनल विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, "ममता दिदिंनी संघर्ष करुन पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला. 'मेरा पश्चिम बंगाल मैं नही दूंगी' असं म्हणत जखमी झालेली महिला देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात उतरलेले असतानाही त्यांनी विजय मिळवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली होती. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना राग येण्याची गरज नव्हती. ते पुढे जाऊन म्हणाले, भुजबळ तुम्ही जामिनावर आहात, तुम्ही निर्दोष सुटलेला नाहीत. अन्यथा तुमचा जामिन रद्द करु, अशा आशयाची प्रतिक्रिया देताना. आज भारतीय जनता पक्षाच्या हातात ईडी, सीबीआय, एनआयए आहे. आता कोर्टही यांच्या खिशात असल्यासारखं ही मंडळी बोलू लागली आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "चंद्रकांत पाटलांनी तत्काळ आमचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची माफी मागावी. त्यांच्या बोलण्याचा जो रोख होतो, जो गर्व होता, तो जनता सहन करणार नाही, त्यामुळे तत्काळ भुजबळांची माफी मागावी."

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या नव्या दाव्यांवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, "परमबीर सिंह प्रकरणी मी सातत्यानं सांगत आलोय की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवण्यात आली त्याचा मास्टर माईंड कोण? कशासाठी ठेवली? हे अजून एनआयएनं जाहीर केलेलं नाही. प्रसार माध्यमांनी अनेकदा सचिन वाझेंसोबतच परमबीर सिंह यांच्याकडे संशयाची सुई दाखवली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी परमबीर सिंहावर आरोप करत तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच एका क्रिकेट बुकीनं आपल्याकडून पैसे घेतल्याचाही आरोप परमबीर सिंहांवर केला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांची तत्काळ चौकशी होण्याची गरज आहे."

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंहांची चौकशी करण्यासाठी असमर्थ असल्याचं सांगितलं आहे. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, "पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंहांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याचं का सांगितलं मला कळत नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावेल ही भिती आहे. असे अधिकारी मोकाट सुटलेले आहेत. यांनी ज्यावेळी 100 कोटींचा लेटरबॉम्ब टाकला, त्यावेळी सगळीकडे याचीच चर्चा होती. पण आता 1 हजार कोटींपेक्षा जास्त परमबीर सिंहांवर आरोप असूनही सर्व शांत का?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

रश्मी शुक्ला यांनी त्यांना पाठवलेल्या समन्स विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणीही हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "रश्मी शुक्ला या पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या गटात गेलेल्या अधिकारी आहेत. त्या फोन टॅपिंग करत होत्या आमदारांच्या, आमचे सहकारी यड्रावकर यांना 20 कोटींची लाच दाखवली होती." तसेच याप्रकरणी सरकारनं धोरण आखून चौकशी करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget