Goa election : मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर आज पणजीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार
भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर आज पणजीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. भाजपनं पणजीतून त्यांना उमेदवारी नाकारली. मात्र उत्पल पर्रिकर तरीही पणजीतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आज ते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. आज पणजीतल्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं थोड्याच वेळात ते पणजीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उत्पल पर्रिकर अर्ज भरणार असतीत तर शिवसेना पणजीतून उमेदवारी मागे घेण्याचा विचार करेल असं संजय राऊत यांनी आधीच स्पष्ट केलंय. तसंच आपचे उमेदवार आणि गोवा उपाध्यक्ष वाल्मिक नाईक यांनीही उत्पल पर्रिकरांसाठी उमेदवारी मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या

















