Goa Election : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपला रामराम केलाय : ABP Majha
भाजपने गोव्यात उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर असंतोष उमटलाय. उत्पल पर्रिकरांनी भाजप सोडल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही तिकीट न दिल्यानं नाराजी व्यक्त करीत भाजपला रामराम केलाय. एक निवेदन प्रसिद्ध करून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राजीनामा दिलाय. मी अनेक वर्षापासून भाजप सदस्य राहिलो आहे. पण मला दुर्लक्षित केलं गेलं. त्यामुळे मी आता या पक्षात राहू शकत नाही. मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. काही दिवसांत याची औपचारिक घोषणाही करेन असं पार्सेकर यांनी निवेदनात म्हटलंय. भाजपत आता कुणीही खुल्यापणाने भूमिका मांडू शकत नाही. बाहेरच्या काही लोकांनी पक्षावर कब्जा केला आहे असा आरोपही पार्सेकर यांनी केलाय.






















