Dhule Winter : धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानात घसरण, थंडीचा कडाका वाढला
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा तापमानात घसरण झाली असून थंडीचा कडाका वाढल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा वाढल्याने सकाळी करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच या वातावरणाचा परिणाम रब्बी पिकांवर देखील होणार असून गहू हरभरा मका या पिकांवर करपा रोगासारख्या अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या थंडीचा परिणाम लक्षात घेता हृदयाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील वैद्यकीय तज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी...

















