Deepali Sayyad : Sushma Andhare यांना शिवसेनेतील अस्तित्व सिद्ध करायचंय ABP Majha
Deepali Sayyad Exclusive : ठाकरे गटाचा सेलिब्रिटी चेहरा दिपाली सय्यद (Deepali Sayyad) आता शिंदे गटात जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एबीपी माझाला (ABP Majha Exculsive) मुलाखत देताना दीपाली सय्यद यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. दिपाली सय्यद यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुम्ही नेमक्या कोणत्या गटात आहात? असा प्रश्न एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर 'मी सध्या वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे, असं वक्तव्य सय्यद यांनी केलं आहे. तसेच, जो निर्णय घेईन तो तुम्हाला लवकरच कळेल, असंही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता दिपाली सय्यद यांचा कल कोणत्या गटाकडे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




















