Deepak Kesarkar : दुसरीपर्यंतच्या शाळेच्या वेळेसंदर्भात लवकरच निर्णय घेणार - दीपक केसरकर
Deepak Kesarkar : दुसरीपर्यंतच्या शाळेच्या वेळेसंदर्भात लवकरच निर्णय घेणार - दीपक केसरकर येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती. पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी सुचविले होते. त्यानुसार तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती केसरकरांनी दिलीए... मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले



















