एक्स्प्लोर
Uddhav Thackeray | फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
दिवाळीत फटाकेबंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. फटाकेबंदीबाबत बोलताना ते म्हणाले की, फटाक्यांवर बंदी आणता येईल, परंतु स्वत:हुन आपण बंधन घालून घेऊ शकतो का? अनेकजण म्हणतात तुम्ही बोलताना कुटुंबप्रमुखासारखे, मोठ्या भावासारखे वाटता, मग त्या नात्याने मी विनंती करतो. फटाकेबंदी पेक्षा प्रदूषण करणारे फटाके टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. डॉक्टर्स, अन्य यंत्रणा यांच्यावर खूप ताण आहे. हे ते कुणासाठी करत आहेत? तुमच्यासाठीच ना? आपली आजवरची मेहनत प्रदूषणामुळे व्यर्थ जायला नको, असं ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले की, बंदी आणून मी तुमच्यावरआणीबाणी नाही आणत आहे. एक दुसर्याच्या विश्वासावर हा आनंद, सण साजरा करू. अन्य ठिकाणी प्रदुषण अधिक आहे. कोरोना आजार श्वसन संस्थेशी निगडित आहे. प्रदुषणामुळे जर हा आकडा वाढत असेल तर दिवाळीत आपण फटाके वाजवणं थांबवू शकतो का? आपण जिद्दीने हा आलेख खाली आणला आहे. आपल्याकडे मुंबईत हजाराचा आकडा शेकड्यात आला आहे, राज्यातही नियंत्रणात आला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा