MNS Protest on Samruddhi Expressway : संकटकालीन उपाययोजना नाही, मनसेने अडवल्या 10 खासगी बस
MNS Protest on Samruddhi Expressway : संकटकालीन उपाययोजना नाही, मनसेने अडवल्या 10 खासगी बस
समृद्धी महामार्गावर 1 जुलैला खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला होता. त्यात अनेक जणांनी आपला जीव गमावला. यावेळी मनसेनं प्रादेशिक परिवहन विभागाकडे खाजगी बसमध्ये आग विझवण्यासंबंधीच्या यंत्रणा उपलब्ध करणे ,आपत्कालीन दरवाजाची काच फोडण्यासाठी हातोडा उपलब्ध करण्याबाबत मागणी केली होती. परंतु ८ दिवसांचा कालावधी होऊनही खाजगी लक्झरी बसमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत, त्यामुळं मनसेनं आक्रमक होत बुलढाण्यातील चिखली येथे १० खासगी बस अडवल्या. सर्व बसेसची तपासणी केली असता ७ बसेसमध्ये संकटकालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याचं आढळून आलं.



















