Bhiwandi : भिवंडीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 04:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhiwandi : भिवंडीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवलं,
भिवंडी तालुक्यातील राहुर गावच्या हद्दीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण आज पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं. तालुक्यातील राहुर या गावात २३ भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना १९७८ मध्ये तब्बल ८० एकर जमीन दिली होती. कालांतराने या जमिनी स्थानिक धनदांडग्यांनी बळकावून बंगले आणि फार्महाऊस बांधले. यावर कारवाई करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई सुरु करण्यात आली.