एक्स्प्लोर

Ajit Pawar on Rohit Pawar : अरे शहाण्या, तू आमदार आहेस, तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोरोना काळात मास्क (Corona Mask) आणि इतर काळजी घेण्यामध्ये सर्वात सतर्क असल्याचं पाहायला मिळालं. आजही ते कुठल्याही कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी अशी काळजी घेतात. सोबतच आपल्या सभोवतालच्या लोकांनाही घ्यायला लावतात.  काल कर्जत जामखेडला गेल्यानंतर तिकडे कोणीच मास्क वापरत नव्हतं. आमचा रोहितच (rohit pawar) मास्क वापरत नव्हता. रोहितला म्हटलं, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् लोक मास्क वापरत नाहीत, हे बरोबर नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

जर तिसरी लाट आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील रघुनंदन पतसंस्थेच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. लसीकरण वाढवण्याकरता उपक्रम राबवा, असाही सल्ला त्यांनी दिला. लसीकरण झाल्यावर जरी कोरोना झाला तरी माणूस वाचतो. कोरोनानं काही होत नाही ही भावना काढून टाका, असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले की,  केंद्र सरकारचं सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. सगळ्या छोट्या बॅंका मोठ्या बॅंकांमध्ये विलीन करुन देशात 6-7 बॅंका ठेवायच्या अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.. त्यातूनच अनेक बॅंकांचं विलीनीकरण केलं जात असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाराला 50 हजारांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं देणं देता आलं नाही.. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. त्याचवेळी अशा संकट काळातही केंद्राकडून जीएसटीची रक्कम येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

त्यांनी म्हटलं की, त्रिपुरा येथील घटनेनंतर नांदेड, मालेगाव आणि अमरावतीत जातीय दंगली उसळल्या. काही समाजकंटकांनी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.. काही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.. मात्र आपण सर्वांनी आपली परंपरा कायम ठेवत जातीय सलोखा कायम राखावा असे आवाहन अजित पवार यांनी केलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget