Ajit Pawar on Ramesh Patil : आमच्याकडे नरमा पावडर...म्हणणाऱ्या रमेश पाटलांवर विरोधकांचा निशाणा
Ajit Pawar on Ramesh Patil : आमच्याकडे नरमा पावडर...म्हणणाऱ्या रमेश पाटलांवर विरोधकांचा निशाणा
विधिमंडळ अधिवेशनात सध्या निरमा पावडरची जोरदार जाहिरात सुरू आहे. कारण भाजप आमदार रमेश पाटील यांनी काल केलेलं वक्तव्य... आमच्याकडे गुजरातहून निर्मा पावडर येतं. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं वक्तव्य रमेश पाटील यांनी केलंय. सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर भाष्य करताना रमेश पाटील यांनी हा अचाट दाखला दिला. आता यावर विरोधकांनी टीकेचे फवारे उडवले नसते तरच नवल. अजित पवारांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच सावध राहायसा सांगितलंय. तर ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जाब विचारलाय.


















