पंढरपूरमध्ये निर्बंध मोडल्यानंतर अजितदादा म्हणाले,'माझ्याकडून असं घडणं चुकीचं, दिलगिरी व्यक्त करतो!'
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
08 Apr 2021 10:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कल्याण काळे यांनी आयोजित कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर झालेल्या तुफान गर्दीमुळे कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचे विदारक चित्र आज पंढरपूर मध्ये पाहायला मिळाले. एका बाजूला पोटासाठी धडपड करणाऱ्या गोरगरीब टपरीवाल्यांना पोलीस आणि प्रशासनाकडून कोरोनाचे नियम दाखवत त्रास दिला जात आहे. दुसरीकडे नेत्यांच्या सभेत मात्र सर्व नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून पाहत राहत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.