ABP Majha Headlines : 1 PM : 25 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 25 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पुण्यातील वेताळ टेकडीवर तरुणाई नशेच्या विळख्यात अभिनेते रमेश परदेशींकडून व्हिडीओ समोर. तर ड्रग्जविरोधात सरकार कधी जागं होणार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
बुलढाण्यात भगर विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार कसे? उच्च न्यायालयात जनहित याचिका, राज्य सरकारला नोटीस
भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार, २९ फेब्रुवारी किंवा १ मार्चला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती
लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न, आम्ही ठरवलं तर एका दिवसात भाजप संपेल, संजय राऊतांचा बावनकुळेंवर घणाघात
उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन असून राज्य मंत्रिमंडळाची बैठक.