ABP Majha Headlines : 04.00 PM : 11 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 04.00 PM : 11 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आरक्षणाबाबत राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या विधानावरून भाजप आक्रमक...काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला, अमित शाहांचा हल्लाबोल...
अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची भारतद्वेष्टी खासदार इल्हान उमर यांच्याशी भेट, देशात राहुल गांधींवर टीकास्त्र, अमित शहांकडूनही समाचार
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता....महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी १३ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार
नागपूरमधील ऑडी अपघाताचं काँग्रेस कनेक्शन समोर, कार चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील जितेंद्र हावरे काँग्रेसचे पदाधिकारी, तर अपघातावेळी कारचा वेग ताशी ६० किमीच्या आसपास, आरटीओची एबीपी माझाला EXCLUSIVE बातमी
नागपुरातील अपघात प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची पोलिसांसोबत चर्चा, कारची देखील केली पाहणी, पोलीस तपासावर अंधारेंचे गंभीर सवाल
शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलं