Dharavi Masjid issue : धारावीत तणाव, कारवाईला गेलेल्या बीएमसी पथकाला जमावाने रोखलं

Dharavi Masjid issue : धारावीत तणाव,  कारवाईला गेलेल्या बीएमसी पथकाला जमावाने रोखलंधारावीतील ९० फूट रस्त्यावरील मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली चार ते पाच दिवसांची मुदत  बृहन्मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या निष्कासन नोटीसनंतर विश्वस्तांनी केलेली लेखी विनंती प्रशासनाकडून मान्य  धारावी येथील ९० फूट रस्त्यावरील अतिक्रमित मशिदीचे बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. तसेच या नोटीसीनुसार कारवाई हाती घेतली होती.   तथापि, सदर ठिकाणचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने चार ते पाच दिवसांची मुदत द्यावी. या मुदतीच्या कालावधीत स्वतःहून बांधकाम हटवण्यात येईल, अशी लेखी विनंती मशिदीच्या विश्वस्तांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ २ चे उपआयुक्त आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांकडे केली आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola