ABP Majha Headlines : 11 AM : 8 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पंतप्रधान मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर, भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर, विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये सभा
नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरु, संघाकडूनही उमेदवारांसाठी चाचपणी सुरु, विश्वसनीय सुत्रांची माझाला माहिती
आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची घेतली भेट, शेलार आणि सलमान खानमध्ये काल लंच डिप्लोमसी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची चर्चा
मविआची उद्या सकाळी ११ वाजता संयुक्त पत्रकार परिषद, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करणार
ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकरांची आज ईडी चौकशी, आपल्याकडून कोणताही गुन्हा घडलेला नाही, चौकशीला जाण्यापूर्वी कीर्तिकरांचं वक्तव्य
रोहिणी खडसे आज शरद पवारांची पुण्यात भेट घेणार, रावेर मतदारसंघांबाबत पुण्यात अंतिम बैठक, रावेरमधून पवार कुणाला मैदानात उतरवणार? याकडे लक्ष
CAA ची अंमलबजावणी रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात दोनशे पेक्षा जास्त याचिका, केंद्र सरकार आज एकत्रित उत्तर दाखल करणार
सिगारेट ओढताना व्हिडिओ काढल्याप्रकरणी नागपुरात तरुणाची हत्या. दोन तरुणींसह तिघांना अटक.