एक्स्प्लोर

सरपंच दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात, सकाळी शिवसेनेत? मुरबाडमधील प्रकार, उपसरपंच म्हणाले...

कल्याण : राजकारणात कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाला. दुपारच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतीतील निवनियुक्त सरपंच, उपसरपंच कुटुंबासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमोद हिंदूराव यांच्याकडून शुभेच्छा मिळवत होते. तर हेच पदाधिकारी सायंकाळी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभेच्छा स्वीकारत होते. तर आज सकाळी हे सर्व शिवसनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या सोबत पाहायला मिळाले. तिन्ही पक्षाचे नेते या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकल्याची घोषणा करत होते. अवघ्या काही तासांच्या फरकाने झालेल्या या राजकीय नाट्याची दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान याबाबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी हे सरपंच आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा केलाय तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रमोद हिंदुराव यांनी देखील निवडून आलेले सरपंच आमचेच असल्याच स्पष्ट केलं आहे.

राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हांशिवाय होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपल्याच पक्षाचा वरचष्मा असल्याचे सांगण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोठमोठे दावे केले जातात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर अशा दाव्यांची मोठी मालिकाच ठाणे जिल्ह्यात पहायला मिळते आहे. मात्र हे दावे करण्यासाठी निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंचांची कशी पळवापळव होते याचे बोलके चित्र मुरबाड तालुक्यात पाहायला मिळते आहे.

मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणात यंदा खुल्या गटातील महिलांसाठी सरपंच पद आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यासाठीही चुरस पहायला मिळत होती. यात दर्शना बांगर यांची सरपंच पदी एकमताने निवड झाली. तर उपसरपंचपदी सुनील बांगर यांची निवड झाली. सरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी काल दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांची भेट घेतली. यावेळी हिंदूराव यांनी सरपंचांच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पट्टा टाकत त्यांचा सत्कार केला. काही मिनिटात भुवन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.खुद्द हिंदूराव यांनी आपल्या फेसबुक पेजवरून याची माहिती दिली.

त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास भुवन ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंचांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भुवन ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. काही मिनिटातच भुवन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा असे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाले.

तर सकाळी हे दोघेही शिवसनेचे ठाणे जिल्हा उपध्यक्ष सुभाष पवार यांच्या सोबत पाहायला मिळाले सरपंच आणि उपसरपंच यांच्या गळ्यात शिवसेनेचा पट्टा टाकत सेनेत प्रवेश केला. या नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंचानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली त्याच कपड्यांवर भाजप आमदारांच्या आणि सेनेच्या नेत्यांच्या भेटीला हे गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबत दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सायंकाळी भाजप आणि सकाळी शिवसेना अशा 24 तासात तीन पक्षांच्या प्रवास करणाऱ्या भुवन ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची चर्चा दिवसभर रंगली होती.

उपसरपंचांचं स्पष्टीकरण

24 तासात तीन पक्ष बदलल्याचे चित्र निर्माण झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अखेर उपसरपंच सुनील बांगर यांनी आम्ही शिवसैनिक असून या ग्रामपंचायतीच्या सात मधील चार जागा शिवसेना व एक जागा राष्ट्रवादीने जिंकली ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेची आहे. आम्ही शिवसेनेत आहोत, हिंदुराव त्या ठिकाणी आले म्हणून आम्ही भेट घेतली तर स्थानिक आमदार म्हणून किसन कथोरेंची भेट घेतली. कुणी तरी राजकीयदृष्टया बदनाम करण्यासाठी हे नाट्य रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बातम्या व्हिडीओ

Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget