एक्स्प्लोर
Jalgaon Amalner : जळगावमध्ये आजपासून 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
जळगावच्या अमळनेरमध्ये आजपासून ९७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी अमळनेरमध्ये ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहेत. यावेळी अनेक साहित्यिक सहभागी होणार आहेत. तर सकाळी साडे दहा वाजता साने गुरुजी साहित्य नगरी इथे साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी सुमित्रा महाजन, अजित पवार, संमेलन अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे, मंत्री दीपक केसरकर इत्यादी मान्यवर उपस्थित असतील.
आणखी पाहा





















