Vir Das विरोधात 'त्या' एका व्हिडीओमुळे Social Media वर संताप ABP Majha
अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भारत देश आणि महिलंबाबतच्या वादग्रस्त कवितेमुळे वीर दासवर टीका होतेय. नुकतंच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला. वॉशिंग्टन डीसीच्या जॉन एफ केनेडी सेंटरमधील वीर दासच्या सादरीकरणाचा हा व्हिडीओ आहे. या सहा मिनिटांच्या व्हिडीओमध्ये त्याने भारत देश आणि महिलांबाबत वक्तव्य केलंय. त्याच्या याच वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वीर दासविरोधात संताप व्यक्त होतोय. वीर दासने देशाचा अपमान केल्याचं म्हणत त्याला देशद्रोही म्हटलं जातंय. सोशल मीडियावरील हा संताप आणि टीका पाहून वीर दासनं स्पष्टीकरण केलंय. आपला उद्देश अपमान करण्याचा नव्हता तर भारत देश महान आहे हे सांगण्याचा होता असं वीर दासनं म्हटलंय.
























