Uniform Civil Code : राज्यसभेत UCC बाबतचं खासगी विधेयक मंजूर, 63 विरुद्ध 23 मतदान
राज्यसभेमध्ये आज प्रचंड विरोधात समान नागरी कायद्यासंदर्भातलं खासगी विधेयक सभागृहात मांडण्यात आलं. भाजपचे खासदार किरोडीलाल मीना यांनी हे खासगी विधेयक पटलावर ठेवलं होतं. हे विधेयक मांडण्यासाठी डाव्या पक्षांसह, काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादीसह अनेक प्रमुख विरोधी पक्षांनी विरोध केला. पण पिठासीन अधिकाऱ्यांनी यावर मतदान घेऊन निर्णय घ्यायचं ठरवलं त्यानंतर 63 विरुद्ध 23 अशा मताने हे खाजगी विधेयक सभागृहाच्या पटलावरती मांडण्यास मंजुरी मिळाली. काँग्रेसचे बहुतांश खासदार यावेळी सभागृहात अनुपस्थित होते. संसदेमध्ये दर शुक्रवारी खाजगी विधेयक वेगवेगळ्या विषयावर मांडली जातात त्यातली फार कमी विधेयकं अंतिम पातळीपर्यंत म्हणजे कायद्याचे रूप घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या























