Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार
Uddhav Thackeray on Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांचा विद्रूप, भीषण, विभत्स चेहरा हा जगासमोर आणला आहे. आपला देश ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते. आणि याच देशामध्ये एक टोळी गेले काही वर्ष हैदोस घालत आहे, त्यामध्ये पक्ष फोडणे, पक्ष चोरणे, लोकशाहीचा खून करणे, अशी ही टोळी कारभार करते. ज्ञानेश कुमारांना तातडीने तुरुंगात टाकून या टोळीचा मुख्य जो मोहरक्या आहे त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ही टोळी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती हेसुद्धा आता लोकांना कळलं असल्याचे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने सुमोटो घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.
म्हणजेच गृहमंत्री याचे सूत्रधार आहेत का?
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोग असं म्हणतात की गृहखात्याच्या सूचना मानतो, म्हणजेच गृहमंत्री याचे सूत्रधार आहेत का याचाही खुलासा झाला पाहिजे. आणि असेल तर त्यांनासुद्धा योग्य ती सजा ही दिली गेली पाहिजे. त्यांनी सांगितले की, ज्ञानेश कुमारांनी पहिला आघात आमच्या शिवसेनेवर यांनी केला. शिवसेनेचं नाव हे पहिल्या पोटनिवडणुकीसाठी गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर निवडणूक आयुक्तांनी एक फार्स केला जो आता उघड झालाय. त्यांनी एकतर्फी निर्णय दिला आणि शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे गद्दारांना दिलं. तीच पद्धत त्यांनी पवार साहेबांच्या बबद्दल वापरली. नाव आणि चिन्ह काही काळ गोठवलं आणि तसं च्या तसं हे त्यांच्या गद्दारांना दिलं. तीच पद्धत आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत ते अवलंबतायत.





















