एक्स्प्लोर

Sharad Pawar : राजधानी दिल्लीत उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची सर्वात मोठी बैठक!

नवी दिल्ली :  2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार आणि प्रशांत किशोर अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते पवारांच्या घरी एकवटत आहेत.. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.

उद्या सकाळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता विरोधी पक्षनेते पवारांच्या घरी एकत्र येतील.  2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत..पण पश्चिम बंगाल मध्ये ममतांनी ज्या पद्धतीने भाजपला टक्कर दिली त्यानंतर भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेस वगळता इतरांनी एकत्र येण्याची गरज आहे का याबाबत या हालचाली सुरू आहेत.. उद्याच्या बैठकीसाठी काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी उपस्थित असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.

मार्च महिन्यात संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर पवार तीन महिन्यांच्या कालावधीनंतर दिल्लीत आले. मधल्या काळात त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे सार्वजनिक जीवनातले कार्यक्रम मंदावले होते.. पण आज दिल्लीत आल्यानंतर ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एकीकडे काँग्रेसला अजून पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसल्याने यूपीएच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त होतात... त्यात पवारांची ही खेळी काँग्रेसला वगळून देशात तिसरी आघाडी निर्माण करणार का हे पाहावे लागेल.

भारत व्हिडीओ

PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अक्कलकोट-कलबुर्गी महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, चार प्रवासी जखमी, ट्रकमधील तांदूळ रस्त्यावर
अक्कलकोट-कलबुर्गी महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, चार प्रवासी जखमी, ट्रकमधील तांदूळ रस्त्यावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
धक्कादायक! गेल्या 48 तासात यवतमाळ जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू, उष्माघातानं बळी गेल्याचं अंदाज
धक्कादायक! गेल्या 48 तासात यवतमाळ जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू, उष्माघातानं बळी गेल्याचं अंदाज
MI vs RR Live Score Updates : रियान पराग, वैभव सूर्यवंशी फेल, तरी राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर ठेवले 206 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या Live अपडेट्स
MI vs RR Live Score Updates IPL 2026 : रियान पराग, वैभव सूर्यवंशी फेल, तरी राजस्थान रॉयल्सने मुंबईसमोर ठेवले 206 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, एका महिन्यात चित्र पूर्ववत होण्याची शक्यता
मोठी बातमी, होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी अपडेट, इराण सामुद्रधुनीतील मार्ग खुला करण्यास तयार, पण...
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
Embed widget