Sachin Tendulkar : वडिलांचं स्वप्न सचिनने केलं पुर्ण, गरीब मुलांना मोफत शिक्षण देतोय मास्टर ब्लास्टर
abp majha web team
Updated at:
16 Nov 2021 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या बाल आश्रय श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा कुटीर विद्यालयाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी मध्यप्रदेशमध्ये आला होता. सेवा कुटीर विद्यालयात गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. सध्या तेथे 2300 मुलं शिक्षण घेत आहेत. यावेळी सचिनने या मुलांशी गप्पा मारल्या आणि क्रिकेटही खेळला. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करायला पाहिजे. आज जर ते असते तर त्यांना हे काम पाहून खूप आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया यावेळी सचिन तेंडुलकरने दिली.