Uttar Pradesh चे माजी मुख्यमंत्री Kalyan Singh यांचं निधन, PM Modi यांच्याकडून श्रध्दांजली अर्पण
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. लखनऊ मधील एसजीपीजीआयमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कल्याण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना ४ जुलै रोजी गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. दरम्यान काल रात्री त्यांचं निधन झाल्याचं रुग्णालयातर्फे सांगण्यात आलंय. आज पंतप्रधा नरेंद्र मोदींसह इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
























