Oscar Awards 2024 : 96व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमरचा दबदबा, ओपनहायमरला 7 पुरस्कार
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOscar Awards 2024 : 96व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमरचा दबदबा, ओपनहायमरला 7 पुरस्कार
96 व्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमर सिनेमाचा दबदबा पहायला मिळाला. या सिनेमानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या ऑस्करसह एकूण ७ पुरस्कार आपल्या नावावर केलेत. महत्त्वाचं म्हणजे ख्रिस्टोफर नोलन या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाला पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर अभिनेता किलियान मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
तर पुअर थिंग्स चित्रपटासाठी एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. पुअर थिंग्ज या चित्रपटाला एकूण चार ऑस्कर मिळालेत.