Lack of Oxygen Death : दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही : केंद्र
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही असा दावा केंद्र सरकारनं केलाय. संसदेत खासदार के सी वेणुगोपाल यांनी उस्थित केलेल्या प्रश्नावर नवनिर्वाचीत आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लिखित उत्तर दिलंय. मात्र दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा ऑक्सिजनची मागणी वाढली होती हे मात्र या उत्तरात नमूद करण्यात आलंय. वास्तविक ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र तरीही सरकारकडून असा दावा झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
ऑक्सिजन अभावी ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल करावा अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेय. तर त्याला भाजपच्या संबित पात्रांनी उत्तर दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या




















