Belgaum Border dispute| मुंबई हा तर कर्नाटकचा भाग;कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडींचं अजब तर्कट
मुंबई : ' सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा', कानडी सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाचं बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी असे म्हणाले, की कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे.
लक्ष्मण सावडी म्हणतात, या भागातील लोकांसह, माझी देखील मागणी आहे की, मुंबई कर्नाटकात सामील करावी. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत, मी केंद्र सरकारला विनंती करतो की मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं.
महत्त्वाच्या बातम्या























