Himanta Biswa Sarma : हेमंत बिस्वा सरमा असतील आसामचे नवे मुख्यमंत्री, विधीमंडळ नेतेपदी निवड
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुवाहाटी : भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा आता आसामचे नवे मुख्यमंत्री असतील. आज झालेल्या विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. हेमंत बिस्वा सरमा हे संध्याकाळी चार वाजता राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा उद्या आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
आज गुवाहाटी येथे एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं की, नवनिर्वाचित सदस्यांनी हेमंत बिस्वा सरमा यांची सर्व संमतीने नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी सर्वानंद सोनोवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.