Hijab वाद प्रकरणातील Bibi Muskan हिला जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेच्या वतीने पाच लाखाचं बक्षीस
कर्नाटकातिल बीबी मुस्कान खान या विदर्यथिनीला पाच लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. जमीअत उलेमा ए हिंद या संघटनेच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आज दुपारपासून कर्नाटकातील एका मुलीचा व्हिडिओ चांगलाच वायरल होताना पाहायला मिळतोय. कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादा प्रकरणातला हा व्हिडिओ आहे. एक विद्यार्थिनी महाविद्यालयात बुरखा परिधान करून आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचा एक गट तिचा विरोध करताना दिसून येत आहे. विरोध करणारा मुलांचा गट मोठा असताना देखील या मुलीने त्यांना उत्तर दिलं. समाज माध्यमांवर या मुलीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. याचेच कौतुक जमिअत उलमा ई हिंद यांनी देखील केले आहे. जमियात उलमा ई हिंद चे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी तब्बल पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा मुस्कान खानसाठी केली आहे.






















