Bengaluru : ट्राफीक जाममध्ये अडकलेल्या डॉक्टरने रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पळत जाऊन गाठला दवाखाना
बंगळुरुतील एका डॉक्टरने तब्बल तीन किलोमीटर धावत जाऊन रुग्णाचे प्राण वाचवल्याची कौतुकास्पद घटना घडलीय. हा डॉक्टर बंगळुरुच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकला होता. तिकडे रुग्णालयात एका रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया करायची होती. ट्रॅफिकमधून वेळेवर सुटका होणार नाही हे लक्षात आल्यानंतर या डॉक्टरने आपली कार सोडली आणि धावत रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. या डॉक्टरांचं नाव गोविंद नंदकुमार असं आहे. ते बंगळुरुच्या मणिपाल रुग्णालयात गॅस्ट्रो एंटरोलॉजी सर्जन म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर नंदकुमार यांचे सहकारी रुग्णाला अॅनेस्थेशिया देण्याची तयारी करत होते. ते ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचताच तातडीने शस्रक्रिया करण्यात आली. हे ऑपरेशन यशस्वी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या
























