Padmashri : राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार वितरण सोहळा, बीजमाता राहीबाई पोपरेंना पद्मश्री
2020 सालासाठी जाहीर झालेल्या देशातील मानाच्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आयसीएमआरचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्री कंगना रनौत, गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचा पद्मभूषण आणि हॉकीपटू राणी रामपालचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या




















