Bihar: मोतीबिंदू ऑपरेशननंतर २५ जणांच्या डोळ्यांना त्रास, चौघांनी दृष्टी गमावली ABP Majha
मुजफ्फरपूरच्या खासगी रुग्णालयात मोतीबिंदू ऑपरेशनदरम्यान हलगर्जीपणा समोर आलाय. ऑपरेशननंतर २५ जणांच्या डोळ्यांना संसर्ग झालाय. यापैकी चौघांना दृष्टी गमवावी लागलीय. तर इतर काही लोकांनाही डोळे काढण्याचे निर्देश डॉक्टरांनी दिलेत. २२ नोव्हेंबरला उत्तर बिहारमधील डोळ्याच्या प्रसिद्ध रुग्णालयात २५हून अधिक जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आलं. या ऑपरेशननंतर या २५ जणांना त्रास होऊ लागला. या प्रकरणी पीडित नागरिकांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलीय. मात्र चुकीच्या ऑपरेशनमुळे या २५ जणांवर उपासमारीची वेळ आलीय.























