IMA for Indian Students: भारतातील कॉलेजमध्ये प्रवेश द्या- आयएमए ABP Majha
रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिथं शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थी मायदेशी परतले तरी अर्ध्यावर शिक्षण असल्यानं त्यांच्या भवितव्याचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. बहुतांशी विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेणारे आहेत. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सुटण्याची भीती निर्माण झाल्यानं त्यांचं भवितव्य अंधारात आहे. अशावेळी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केलीय. युक्रेनमधून परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नियमांमध्ये सूट देऊन भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांत त्यांना प्रवेश द्यावा आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करावं, अशी मागणी आयएमएनं केलीय. शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं असंही आयएमएनं म्हटलंय....