Flying Bike : सव्वा सहा कोटींची फ्लाईंग बाईक,उडणारी बाईक पाहिलीत का ? : ABP Majha

Continues below advertisement

बातमी ट्रॅफिक जामच्या समस्येवर उपाय शोधणारी. डेट्रॉईटमध्ये ऑटो शोमध्ये एक उडणारी बाईक सध्या सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र ठरलीय. एक्स टूरिझ्मो फ्लाईंग बाईक ही एक हायब्रिड इलेक्ट्रिक हॉवरबाईक आहे. एअरविन्स टेक्नॉनॉलॉजीजने या बाईकची निर्मिती केलीय. या बाईकची किंमत सध्या ७ लाख ७० हजार डॉलर्स म्हणजे तब्बल सव्वा सहा कोटी इतकी आहे. या बाईकला अजून अनेक टप्पे पार करायचे आहेत. मात्र ती प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यास आरोग्य सुविधा तात्काळ पोहोचवणे यासह  त्याचा उपयोग गरजवंतांना मदत करणे किंवा सुरक्षा यंत्रणांना एखाद्या अशक्य ठिकाणी पोहोचण्यासाठी होऊ शकतो. अगदी आपत्कालीन परिस्थितीत ही बाईक फायदेशीर ठरु शकते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram