![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राजावाडी रुग्णालयात लसीकरणावेळी कंटाळा येऊ नये म्हणून मधुर संगीत, पेंटिंग्ज लावून मनोरंजन!
जेष्ठ नागरिक आणि दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना कोव्हिड लसीकरणला सुरुवात करण्यात आली आहे.मात्र अचानक लसीकरण केंद्रावर गर्दी आणि त्यात कोव्हीन अँपच्या बिघाडाने अनेक ठिकाणी याचा फज्जा उडताना दिसतो आहे.मात्र पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयात मात्र लसीकरण सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि खेळी मेळीत होताना दिसते आहे.एक दिवसात सहाशे नागरिकांना लस देण्याचे लक्ष या रुग्णालयात आहे.राजावाडी रुग्णालयाने भव्य असे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीपासून वेगळे शेड उभारले आहे.यात पाच लसीकरण केंद्र आणि तीन विभाग उभारले आहेत.ज्यात दोन प्रतीक्षालय आणि एक निरीक्षणालय आहे.यात शारीरिक अंतर ठेवून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी हवेशीर व्यवस्था, विविध पेंटींग आणि मधुर संगीत लावण्यात आले आहे.यामुळे इथे जेष्ठ नागरिक कंटाळताना दिसत नाहीत. यामुळे या केंद्रावर कोणताही गोंधळ तर नाहीच उलट शिस्तबद्ध आणि शांततेत लसीकरण सुरू असल्याचे दिसते आहे.याबद्दल जेष्ठ नागरिकांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.
![Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/2e09b1def04069ee5861b040e70a88671719579344410977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/15aac827ed929ded8aaee1795ff678a81719513646777976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/118c175f8c46a9841abf4a337f2a5e4b1719513294995976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/f698d23911d64760b6304be4b12115041719512985818976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/b9bb3bae1fa8407f23d3547fa00833811719512459018976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)