Asim Sarode : शिवसेनेचे 12 आमदार ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंच्या यादीत नावं कुणाची?
राज्यात लोकसभा निवडणुकांचे राजकारण तापू लागले असतानाच निर्भय बनो सभेच्या माध्यमातून भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. चंद्रपुरात आज आम्ही निर्भय चंद्रपूरकर या बॅनरखाली निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले. न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर निर्भय बनो सभेला संयोजक डॉ. विश्वंभर चौधरी आणि एड. असीम सरोदे यांची वक्ते रुपात उपस्थिती होती. 2024 च्या निवडणुकीत मोदी -शाह व भाजपला सरसकट पराभूत करा असा संदेश त्यांनी भाषणातून दिला. एड. असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या बारा शिवसेना आमदारांना परत यायचे आहे असे सांगत त्यांची यादीच वाचून दाखविली. तर डॉ. विश्वंभर चौधरी यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या सिद्धेश कदम यांच्या योग्यतेविषयी सवाल विचारले.























