Aurangabad: तीस-तीस घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी,घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन राठोडला अटक
मराठवाड्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या तीस तीस घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी समोर येतेय...गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन राठोडला अटक करण्यात आलीय. . तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक करुन साठेअठरा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील शेकडो शेतकरी, अधिकारी, राजकीय नेत्यांनी या तीस-तीस योजनेत पैसे गुंतवणूक केली होती. मात्र वर्षभरापासून या योजनेचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन राठोड पैसे परत देतो म्हणून टाळाटाळ करत होता. तर काही दिवस तो फरार सुद्धा झाला होता. तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक केल्याची कबुली दोन दिवसांपूर्वी संतोष राठोडनं एबीपी माझावर दिली होती. या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधीच्या घरात असण्याची शक्यता आहे.
























