एक्स्प्लोर
Aurangabad : कुठून सुरू झाली औरंगाबादच्या नामकरणाची कहाणी ? पाहा ABP माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून करण्यात येते आहे. मध्यंतरी सरकार स्तरावरही विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली केल्या होत्या. मात्र आता औरंगाबादच्या नामांतरासाठी हालचाली सुरु झाल्याचं समोर येत आहे. कारण राज्य सरकारच्या जीआरवरच संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्याचा जीआर काढण्यात आला आहे. राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आलामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
आणखी पाहा























