एक्स्प्लोर
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीसाठी पडळकरांनी चौंडीमधून रथयात्रा सुरु
अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे... भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी नामांतराची मागणी केली होती.. त्या पार्श्वभूमीवर नामांतराच्या मागणीसाठी आजपासून चौंडी येथून रथयात्रा सुरू होणार आहे. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रथयात्रेची सुरुवात होणार आहे... पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने रथयात्रेचं नियोजन करण्यात आलंय.. 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचाे समारोप होणार आहे.
आणखी पाहा























