![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
pakistan Tweet : एका ट्विटमुळे पाकिस्तानची अब्रू वेशीवर
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचं नाक पुन्हा एकदा कापलं गेलंय. कारण सर्बियातील पाक दूतावासनं केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेलीय. सर्बियातल्या पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मुलांना स्थानिक शाळेतून घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. कारण मागील अनेक महिन्यांपासून महागाई आणि पाक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अधिकाऱ्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरता आली नाही. परिणामी शाळेनं मुलांना घरी पाठवल्यानं आता अधिकारी वर्ग संतापलाय. या अधिकाऱ्यांनी ट्विट करुन थेट पाक पंतप्रधान इम्रान खान यांनाच घेरलंय. अशा परिस्थितीतही अधिकारी वर्गानं आणखी किती काळ गप्प राहायचं? असा सवाल इम्रान खान यांना विचारणारं ट्विट खुद्द सर्बियातल्या पाक दूतावासानं केलंय. त्यामुळे आता खोटारड्या आणि बेभरवशाच्या पाकिस्तानची अब्रू वेशीवर टांगली गेलीय.
![Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/76f8703f4732957b71642291bbacbf511719899432195719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/5d22f828d35e6316d3156cc59cfda5841719807824151719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/e674075ef169738e65cae643226ea22e1719762682704977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)