मनमाड : माकड पाणी पिण्यासाठी गेलं आणि विहिरीत अडकून पडलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनमाडमध्ये उकाड्यानं हैराण झालेलं माकड. पाण्याच्या शोधात विहिरत उतरलं मात्र २४ तास उलटल्यानंतरही ते विहिरीत तसं अडकून पडलं आहे. मनमाडमध्ये उष्णतेचा पारा चाळीशीवर गेला आहे. त्यात तहानलेल्या माकड आपल्या पिल्लासह विहिरीत उतरलं. मात्र विहिर खूप खोल असल्यानं माकडाला बाहेर पडताच आलं नाही. अखेर केळी खाली सोडून दोरीच्या सहाय्यानं माकडाला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र ग्रामस्थ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अद्याप माक़डाची सुटका करण्यात यश आलेलं नाही.