मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहतील. यावेळी हा दावा समरी ट्रायल प्रमाणे न चालवता तो समन्स ट्रायल प्रमाणे चालवावा, या अर्जावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोषारोप न्यायालयासमोर मांडले जाणार असून प्रिन्सिपल सिव्हिल जज शेख यांच्याकडे सुनावणी होणार आहे. यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी सहा मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.