मुंबई: लोकल रेल्वेत मोबाईल चोरणारी महिलांची टोळी जेरबंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या महिला टोळीला जेरबंद करण्यात आलंय. लोकमान्य टिळक टर्मिनल्स परीसरात गस्त घालत असताना पोलिसांना काही महिलांची हालचाल संशयास्पद असल्याचं आढळून आलं. या महिलांना ताब्यात घेवून पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी या महिलांकडे असलेल्या बॅगेत तब्बल 25 महागडे मोबाईल फोन मिळून आलेत. या सर्व मोबाईलची किंमत अंदाजे 2 लाख 94 हजार रुपये इतकी आहे. लोकलमध्ये हे फोन चोरल्याची कबुली अटकेत असलेल्या महिलांनी दिलीय.