मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर गरब्यात नाचणाऱ्या सोमय्यांना भाजपच्या रेल्वे समितीतून वगळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतल्या रेल्वे स्थानकाची उंची मोजणारे नेते अशी भाजप खासदार किरीट सोमय्यांची ओळख... मात्र एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर पाठपुरावा घेण्यासाठी भाजपनं स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीत किरीट सोमय्यांना स्थान मिळालेलं नाहीय. एलफिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर किरीट सोमय्या चक्क गरब्यात नाचताना दिसले. त्यामुळं भाजपनं सावध भूमिका घेत त्यांना रेल्वे समितीतून वगळल्याचं समजतंय. तसंच या प्रकरणी किरीट सोमय्या मौन बाळगून आहेत. भाजपच्या रेल्वे समितीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मधु चव्हाण, भाई गिरकर आणि प्रभाकर शिंदे यांना या समितीत स्थान देण्यात आलंय.