Mumbai Kabaddi | मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत भाई जगताप, विश्वास मोरेंचं पॅनेल विजयी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2019 09:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाई जगताप आणि विश्वास मोरे यांच्या सत्ताधारी पॅनेलनं पुन्हा एकदा बाजी मारली. कार्यकारणीच्या २५ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यात सत्ताधारी पॅनेलचे भाई जगतापांसह सर्व २५ उमेदवार विजयी झाले. तर शिवसेना पुरस्कृत पॅनेल पूर्णपणे अपयशी ठरलं. त्यात सचिन अहिर यांच्यासह सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिरात ही निवडणूक पार पडली.